७ जून २०१५ (रविवार) दिवस २ उदयपुर ते रूपनगढ (राजस्थान) (317 km)उदैपूर हून निघायला दुपारचे १२ वाजले। तोपर्यंत आठवलं कि अरे आपण facebook वर mumbai२Ladakh२०१५ नावच page बनवल आहे…शायनिंग बिय्निंग साठी नाही तर एकदा page वर update केल कि मग कोणीphone,SMS अस काही करून त्रास देत नाहि. आता इंटरनेट पण मध्ये मध्ये काम करेनास झाल …आता हे सारबघणार कोण…तितक्यात विनय किलजे उर्फ भाऊ, भावड्या मदतीला आला… विनय केसरी सोबत काम करतअसताना अक्खा काश्मीर पालथा घालून आलेला. करीझमावरून गड किल्ले फिरणारा रोशन चा आणि माझाcommon मित्र. आता विनय ह्या सफरीचा online भाग झाला. तर मग निश्चिंत होवून आम्ही निघालो आधी रस्ताशोधत जयपूरचा रस्ता धरला…एका चौकात जेव्हा तीन रस्ते लागले तेव्हा नक्की कुठे जायच ह्यांचा थांगपत्ता लावतअसतानाच. वैभव भाऊ मागून पुढे निघून गेले, कानात गाणी वाजत असली कि कोण थांबतय… वैभवचा फोनबंद…शेवटी आम्ही थांबलो… तो मागे येई पर्यंत पण तो काय आला नाही. तोपर्यंत कोपर्यात मस्त एकां दुकानातmango juice दिसला. तपती गर्मी मे आम का थंडगार juice…finally आम्ही निघालो वैभव ला सोडून २० kmपुढे आल्यावर वैभव चा call आला…घाल घाल शिव्या घातल्या, असो आम्ही एका ढाब्यावर जेवायला थांबलो तोवरवैभव हि पोहचला…दाल बाटी आपली fix order…रोशन जास्त विचार न करता दाल राइस सांगून मोकळा…वैभव अजून दही भातावरच होता आणि हिरेन भाउंची फ्लोवरची भाजी तेलांन भरून आली होति. रस्ता सामसूमहोता…पुढे परत थांबलो घेण्यासाठी तर हॉटेल मालक मराठी मध्ये बोलू लागले…ते मुळात नागपूरचे आठवड्यातूनएकदा नागपूर कुटुंबां कडे बाकी इथेच हायवे वर हॉटेल मध्ये…संध्याकाळी ५ च्या सुमारास परत हिरेनची आणि आमची चुकामुक झाली… शेवटी जयपूर ला भेटू अस ठरल. पणएका पेट्रोल पंप वर पेट्रोल भरत असताना चाय पे चर्चा करत असताना किशनसिंग नामक ट्रक driver शी ओळखझाली…गडी लयी झकास अक्ख्खा भारत फिरला होता ट्रक मधून, तो म्हणाला अरे जयपूर को क्यू जा रहे हो?और दिल्ली में क्या traffic देखना है क्या?… आओ तुम को shortcut बताता हुं… आता भरोसा करायचा किनाही? हा विचार आला पण चला तस हि रस्तो पे भरोसा रखना हि पडेगा कही ना कही हमारे रास्ते से जुड हिजायेंगे…ठरल तर जयपूरच्या आधी किशन गढ नावाच्या गावा वरून पंजाब गाठायचं थेट…निघालो हिरेन भवानीपुरा गावा जवळ थांबला होता।र्स्ता चुकलो छोटी मोठी गाव लागत होती। आणि मग समजल कि आपण चितोडगढमध्ये आहोत… चितोड गढ महाराणा प्रताप यांची आठवण करून गेला. आणि त्या सोबत आठवली कृष्णप्रियामीरा…वेड लावल होत मीरेने जेव्हा नाटक केल होत तीन वर्षापूर्वी… असो finally हिरेन भेटला आणी सूर्यमावळला, आम्ही रात्र असो वा सकाळ बाइक चे लाईट चालू ठेवत असू आमची ती खूण होती कि आपला माणूसमागे आहे म्हणून.आता रात्रीचे ११ वाजले होते…रस्त्यात जेवायला चांगली जागा मिळाली नाही… पुढचा रस्ता जंगलाचा होता…सुसाट निघालो थेट १ वाजता रात्री एका लहान गावात आलो, चहाची टपरी चालू होती… अमृत म्हणतात ते हेच।चौकशी केली तर आम्ही रूपन गढ मध्ये पोहचलो होतो…. हे गाव google map हि दाखवत नाही नीट. जेवायलाकाही मिळणार नाही याची खात्री झाल्यावर, मदतीला धावून आल लहानपणीचे आवडते बिस्कीट पार्ले G. दोन चारचहा आणि बिस्कीट चे पुडे संपवले। आता पुढे काय। जायचं कि थांबायचं… बरीच चर्चा झाली आम्ही टार्गेट पेक्षाथोडे मागे होतो. पण पुढे हॉटेल मिळेल याची शंका होती. त्या गावात एकच हॉटेल होत….जाउन तिथे उठवल,घासा घीस केल्यावर थांबलो तिथेच…वैभव अजून पण शांतच होता…रोशन पुढ चे किलो मीटर च गणित करतबसला…हिरेन हिशोब (तो आमचा offcial account manager होता) आणि मी कॅमेरा…. झोपायला २वाजले….आज रविवार होता काय?च्यामायला वाटलाच नाही …डोळे मिटले तरी हायवे दिसतोय आणि कानात Royal Enfield चा आवाज घुमतोय…
Author Archives: garamvadapav
My First Blog Post
Be yourself; Everyone else is already taken. — Oscar Wilde. This is the first post on my new blog. I’m just getting this new blog going, so stay tuned for more. Subscribe below to get notified when I post new updates.
Introduce Yourself (Example Post)
This is an example post, originally published as part of Blogging University. Enroll in one of our ten programs, and start your blog right. You’re going to publish a post today. Don’t worry about how your blog looks. Don’t worry if you haven’t given it a name yet, or you’re feeling overwhelmed. Just click theContinue reading “Introduce Yourself (Example Post)”